About Us

मी साधारणतः माझ्या 18 व्या वर्षा पासून ह्या व्यवसाय मध्ये आहे, माझ्या आई वडिलांकडून मी कॅटरिंग शिकले, मला मनापासून स्वयंपाक बनवायला आवडतो. वेगवेगळे पदार्थ बनवणे हा माझा छंदच आहे जणू… त्यातच मला सासरची मंडळी सुद्धा केटरर्स मिळाली मग काय दुधात साखरच. ज्यांच्याकडे मला स्वयंपाक बनवण्याची संधी मिळते तिथे कौतुक आणि शाब्बासकीची थापच मिळते, हेच माझ मोठं बक्षीस आहे.

ह्या व्यवसायाला मला 25 वर्ष पूर्ण होत आहेत परंतु मला माझ्या व्यवसायाची प्रसिद्धी करावी असा कोणी म्हणले नाही पण कर्मधर्म संयोगाने मी एका ऑर्डर मध्ये एका software designer ला भेटले.. तेव्हा भरपूर ऑर्डर्स मिळतात. हे सगळं तुमच्याच आशिर्वादामुळे घडत आहे. धन्यवाद…..

आमचे कडे मजुरी पद्धतीने व कान्ट्रैक्ट पद्धतीने सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डर स्विकारल्या जातील. बारसे, डोहाळजेवण, वाढदिवस व पार्टी ऑर्डर्स  स्विकारल्या जातील.
स्वादिष्ट जेवण हेच आमचे वैशिष्ठ.

2 (13)